DONATE NOW

आधारची वाटचाल

“मानव सेवा हीच ईश्वरसेवा” हा संतानी सांगितलेले मंत्र जोपासत संगमनेरमधील सामाजिक भावनेनी काम करणारी सेवाभावी संस्था म्हंजी “आधार फाउंडेशन” होय.

सामाजिक बांधिलकी जपली जावी, निराधार तसेच उपेक्षितांच्या आयुष्यात “आशेचा किरण” निर्माण व्हावा या उद्देशाने १५ मे २००७ रोजी आधार फाउंडेशनची स्थापना झाली.

आधार फाउंडेशनचे आजपर्यंत ६०० पेक्षा अधिक सभासद झालेले आहेत, महाराष्ट्रातील नाशिक,पुणे,मुंबई,सिंधुदुर्ग,सातारा, आदि विविध जिल्ह्यातील व्यक्तींनी आधारचे सदस्यत्व स्वीकारले आहे. 

आधारच्या माध्यमातून जाती-धर्माचा विचार न करता मानवी कल्याणाची, विवेकाची, संत गाडगे बाबा,संत तुकाराम आदि संतांच्या विचाराची वाटचाल चालू आहे.
खरं तर असलेलं मनुष्यत्व स्वीकारत,व नसलेलं देवत्व नाकारत आधार परिवार समाजहिताचे व उपेक्षितांसाठी नेतृत्व करत आहे. वंचित,उपेक्षित,निराधार, पददलित,तसेच कुणा मनोरुग्णाच्या जीवनात चैतन्याची पहाट निर्माण व्हावी यासाठी आधार परिवार सतत प्रयत्नशील आहे.

1 comment:

  1. Namaskar,
    Majh naav Husain Shaikh
    Rahnara mul cha punyat asun vadilanchi riksha chalvun Ghar kharch madhe hathbhar laun jagat ahe..
    Majh prashn asa hota ki majhi mothi bahin jila gele 2 varsha pasun bonemarrow cha tras ahe je ki upchar vyavasthi na bhetlyane saddhya tras khup vadhlela ahe jyach ki Mumbai madhe jaslok hospital madhe operation karavayach asun operation sathi 25 lakh ch kharch sangitla ahe amhi tich lagn houn tila 3 por dekhil ahet majhya tayi che husband hyanchi hi arthik paristhiti changli nasun evdhe paise chi vyavstha karn avghad ahe tari mala majhya bahini sathi aplya foundation dvare kahi madat milali tar khup upkar hotil...
    Husain Shaikh
    13 Tadiwala Road,Bhaji market javal,sangita zopadpatti,Pune 411001
    Mob-: 7058710865

    ReplyDelete

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.