DONATE NOW

सहभागी व्हा




 कुणाला शिकायचं आहे.. कुणाला चालायचं आहे.. कुणाला धावायचं आहे..
आणि कुणाला दु:खास सामोरे जायचेय..
कुणी रुग्ण, तर कोणी मनोरुग्ण आहे...
कुणी निराधार, कुणी अनाथ तर कोणी दुर्बल आहे...

इथं हवा आहे आधार ...
इथं हवं आहे जगण्याचं बळ..
लढण्याची प्रेरणा अन मानसिक बळ..

ज्यासाठी तत्पर आहे संगमनेर मधील सामाजिक बांधिलकी जपणारे ' आधार फाउंडेशन '.
येथे प्रत्येकजण महिन्याला देतो १० रुपयांचे योगदान..
अर्थात वर्षाचे रु. १२०.
यातून तयार होते एकीचे बळ आणि उर्जेचा स्रोत..!

२००७ सालापासून हजारोपेक्षा अधिक गरजूंपर्यंत आधार फाउंडेशन पोहोचले आहे. संगमनेरच नव्हे तर मुंबई,ठाणे,नाशिक,पुणे आदि महानगरातील सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं आधारला जोडली आहेत. आपणही खारीचा वाटा उचलून सहभागी होऊ शकता.


आपण आधार साठी काय करू शकता ?
दरमहा फक्त १० रु. प्रमाणे १२०रु. वार्षिक वर्गणी देणे
फॅमिली पॅकेज घेणे. कुटुंबातील सर्व व्यक्ती आधारचे सभासद होणे.
आधार दत्तक पालक योजनेचे अभासाद होऊन एखाद्या होतकरू व गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च सांभाळणे. (आयकर विभागाकडून आधार ला 80g मान्यता प्राप्त)
               इ. १ ली ते ४ थी साठी रु. २०००/-       . ५ वी ते ७ वी साठी रु. २५००/-
               इ. वी ते १० वी साठी रु. ३०००/-      इ. ११ वी ते १२ वी साठी रु. ३५००/-
लग्न सभारंभ, वाढदिवस अथवा इतर कार्यक्रमातील अवास्तव खर्च टाळून आधारला मदत करणे.
आधारच्या महारक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करणे
        (प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर)
गरजू व्यक्तीबाबत आधारशी संपर्क करणे.
आधार च्या मासिक सविचार सभा (मिटिंग) मध्ये सहभागी होणे.

        (प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला, ठिकाण: आधार फाउंडेशन कार्यालय.)


बँक :           इंडियन ओवरसीज बँक, संगमनेर
खात्याचे नाव: आधार फाउंडेशन, संगमनेर
खाते नं: १९७०० १०००० ०६०६०
IFS Code: IOBA0001970
TAN : PNEA17871A
Email : adhar.foundation@rediffmail.com
Website: www.adharfoundation.in

2 comments:

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.