DONATE NOW

Friday, December 3, 2021

आदर्श शिक्षक..उत्तम लेखक,समाज प्रबोधनकार, चांगले कलाकार, कवी.. समाजभान असलेला चांगला माणूस....

No comments:

 मा.लतिफ पटेल सर..

नुकतेच घर बांधले, अन्नदान गरजूला करावं म्हणून आधार दिवाळी आठवली..

सत्पात्री दान जाईल याची खात्री वाटली...

शिवाय आज लतिफ गुरूजींचा वाढदिवस आहे..हा संगम साधत..

आधार दिवाळीसाठी.. ₹ 5000 -पाच हजार मात्र.अनमोल देणगी आनलाईन दिली.

वास्तुशांतीचा खर्च वाचवून जात..धर्म न मानता... मानवतावादी सन्मा. लतिफ महंमद पटेल गुरूजींना ...

*आधार परिवाराच्या लाख लाख शुक्रिया*..


हिंद देश के निवासी..

सभी जन एक है।

रंग रुप वेश भाषा...

चाहें अनेक हैं।

लतिफ सर आपण चांगला संदेश भारत वासियांना..दिलात... धन्यवाद...



 


Read More

"शुभम संजय वाघ आधारच्या मदतीने आय टी आयला दाखल..."

No comments:


वडील लहानपणी वारलेले.आई मजुरी करुन कशीबशी कुटुंब चालवायची. मोठा मुलगा कॉलेजला जाऊ लागला. आता मुलांचा आधार मिळेल.आईला खूप बरं वाटायचं. पण अचानक मोठ्या मुलाचा मित्रांकडून घात झाला. आभाळच कोसळलं... नव-याच्या धक्यातून बाहेर यायच्या आतच मुलाचा दुसरा धक्का बसला, अन् आईवर मानसिक परिणाम झाला.  

आई संगिता हीस श्रीरामपूर येथील डॉ. उंडे यांचा उपचार चालू असून दर महिन्याला दोन ते अडीच हजार रूपये खर्च येतो. शुभम सुट्टीत शेतात मिळेत ते काम करून थोडेफार येणाऱ्या पैशात कुटुंब चालवून शिक्षणही घेत आहे. आईच्या मानसिक असंतुलनामुळे घरी आल्यावर स्वयंपाक करण्यासाठी त्याला वयोवृद्ध लिलावती आजीला मदत करावी लागते.

     परवा मदत घेण्यासाठी आजीही शुभम सोबत आली होती. "सर, शुभमला स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे.. असं काही पुण्याचं काम करा.. लई उपकार होतील." हे सांगताना तिची मान डुगडुग करत होती." बोलताना तिचा आवाज कापत होता, डोळ्यात अश्रू होते. मी आजीला व शुभमला धीर दिला.

अमृतवाहिनी आयटीआयचे प्राचार्य एस टी देशमुख  यांनी शुभमची परिस्थिती समजून घेतली. त्याला फिटर ट्रेडसाठी प्रवेश दिला.ते शुभमला "अर्न अँड लर्न" योजनेत सहभाग देणार आहेत. उरलेल्या फी बाबत शिष्यवृत्ती मिळवून देणार आहेत.

 इतर सहकार्य करणार असल्याची माहिती प्राध्यापक बाळासाहेब आहेर यांनी दिली.शुभम अत्यंत संघर्षात १२ वी झाला असून शेतात मिळेल ते काम करुन कुटुंब चालवत आहे.

आधारने नुकतेच शुभमला दत्तक घेतले असून अमृतवाहिनी आय टीआय कॉलेजला प्रवेश दिला आहे.

शुभमच्या प्रवेशासाठी आधार फाऊंडेशन संस्थेने नुकताच *दहा हजार रुपयांचा चेक* दिला. वह्या,सॅक,आदी साहित्य दिले.

शुभमला तिगाव ते अमृतवाहिनी  कारखाना, अमृतनगर हे २५ किलोमिटर अंतर ये-जा करायचे आहे. एसटीचा संप असल्याने दररोज त्याचा ९० रु खर्च कसा करावा हाही प्रश्न आहे. 

पण शुभम अत्यंत समजदार आहे.संघर्ष करायची त्याची तयारी आहे. जिद्द अन् प्रयत्नांची पराकाष्ठा करत आधारच्या साथीनं त्याला आपण बळ देऊया.. माणूसपण जपत त्याच्या पंखात बळ देऊया.


Read More

ऊसतोड कामगारांची दिवाळी "आधार"कडून गोड.

No comments:

 






Read More

Friday, October 22, 2021

"आधार दत्तक योजनेतील विद्यार्थ्यास नवीन सायकल भेट दिली"

1 comment:

 आज आधार शैक्षणिक दत्तक पालक योजने अंतर्गत  श्रमिक ज्युनियर कॉलेज,संगमनेर येथे 12वी वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या

 हुजैफ असिफ  शेख या विद्यार्थ्याला गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा,आदर्श शिक्षिका सौ.वृषाली कडलग मॅडम यांनी नवीन सायकल भेट दिली. 

याप्रसंगी आधार फाउंडेशन चे समन्वयक डॉक्टर महादेव अरगडे, पी. डी. सोनवणे सुखदेव इल्हे आदि उपस्थित होते.

 धन्यवाद मॅडम



Read More

"कोविडग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्याला आधारने घेतले दत्तक"

No comments:

 संगमनेर :-(प्रतिनिधी)

सुदर्शन संजय बिडवे. मु. पो- हिवरगाव आंबरे, ता- संगमनेर 

 इयत्ता 12 वी सायन्स


वडीलांचे ०१/०९/२०२१ रोजी कोविड 19 ने वारले.घरावर संकट कोसळले.

सलून काम बंद झाले. आई घरकाम करते. सुदर्शनच्या 12वी प्रवेशासाठी आधारने  मदने सरांच्या माध्यमातून सह्याद्री कॉलेजमध्ये फोन करून फी कमी केली.

उरलेले 2000 ₹ आधारने नुकताच चेक दिला.

सुदर्शनचे शिक्षण पुर्ववत सुरु झाले. आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेत त्याला वह्या, पुस्तके, शूज सॅक आदी साहित्य दिले.





Read More

"बाल मूर्तिकार रेवणनाथ नवलेला आधारने घेतले दत्तक"

No comments:

   तालुक्यातील मालदाड येथील बाल मूर्तिकार रेवणनाथ नवले या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर नुकताच प्रसारित झाला.

 त्यामध्ये हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक अध्ययनापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले. 

कारण कोविड-१९ या आजाराच्या  प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण चालू आहे.

 भूमीहीन असणारे,अपघाताने दिव्यांग झालेली वडील सध्या काम नसल्याने घरीच आहेत. आई मोलमजुरी करते, अशात अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी पैसे कुठून आणणार? 

घरात खाणारी तोंड पाच अशाही परिस्थितीत उपजतच शिल्पकलेचे ज्ञान अवगत असलेला रेवणनाथ हा त्यांचा मोठा मुलगा इयत्ता सहावीत शिकतोय वयाने लहान असला तरी फोटो पाहून हुबेहूब मूर्ती बनविण्याचे कसब त्याच्या अंगी आहे 

जणू काही एखादा निष्णात कलाकारच मूर्तिकार असावा, अशा मूर्ती स्वतःच्या हाताने कोणतेही यांत्रिक साहित्य न वापरता तो तयार करतोय, रंगवतोय.

याची चाहूल त्याच्या मुख्याध्यापकांना गृह भेटीदरम्यान लागली. त्यांनी मूर्ती बनवत असतानाचा एक व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर अपलोड केला.

 त्यानंतर हा व्हिडिओ आधारचे शिलेदार बाळासाहेब गडाख व आधारचे समन्वयक अनिल कडलग यांच्या पाहण्यात आला. 

त्यांनी आधार समन्वयकांशी चर्चा करून सुरुवातीला त्याच्या शैक्षणिक  गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे सुचवले. 

सर्व परिस्थिती समजावून घेत आधार समन्वयकांनी या विद्यार्थ्यांची आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेसाठी निवड केली.

 त्यानंतर कॉर्नर मोबाईल शॉपीचे संचालक संजय अभंग यांच्या सहकाऱ्याने आधार फाउंडेशनने रेवननाथला  ऑनलाईन शिक्षणासाठी एक अँड्रॉइड मोबाईल घेतला. 

तसेच शालेय उपयोगी साहित्य, स्कूल बॅग, गणवेश, शूज  आदि साहित्यासह आधार समन्वयकांनी रेवणनाथचे घर गाठले.  

सोबतच शिल्पकार सुनील मादास हे ही होते.  त्यांनी या बाल मूर्तिकारांची शिल्पकला पाहून त्याला त्याच्या आयुष्यात शिल्पकार बनण्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींसाठी मदत करण्याचं जाहीर केलं. 

आधारची ही भेट पाहून रेवणनाथसह त्याचे कुटुंबीय भारावून गेले. आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेअंतर्गत रेवणनाथच्या पुढील शिक्षणाची सर्व जबाबदारी आधार फाउंडेशनने उचलली आहे.

यासाठी आधारचे मार्गदर्शक साहेबराव नवले यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.आणखी काही सामाजिक संस्थानी मदत केल्यास गरजू व होतकरू कुटुंबाच्या प्रगतीसाठी रेवणनाथ भविष्यात नक्कीच उंची गाठू शकेल.

   याप्रसंगी आधारचे समन्वयक सोमनाथ मदने, अनिल कडलग, बाळासाहेब गडाख, सुनिल मादास,सुखदेव गाडेकर,सरपंच गोरक्ष नवले,

श्रमशक्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास डोंगरे, गोपीनाथ नवले, निलेश नवले, सचिन नवले, जालिंदर नवले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.




Read More

"इंजिनिअर गायत्रीला मिळाला लॅपटॉप, शिक्षणातील अडथळा झाला दूर."

1 comment:


"आधार संगमनेर व नाशिक आधारने दिला आधार"

Apex computer चे संचालक लांडगे साहेब व मोठी बहीण दिपाली या सर्वांच्या सहकार्याने सेकंड हँड सोनी कंपनीचा कोअर आय 5 लॅपटॉप खरेदी केला.

*आधार फाउंडेशन संगमनेर*

----------------------------------------

"आधार फाऊंडेन संगमनेर आणि पी. एस. आय. मा. मृणाल पवार साहेब" यांच्या अनमोल मदतीने आधार दत्तक पालक योजनेअंतर्गत इंजिनियरिंग द्वितीय वर्षात शिकणारी माझी बहीण गायत्री रामनाथ सोनवणे हिला लॅपटॉप देण्यात आला.

 गायत्रीची गरज लक्षात घेता आधारने अगदी कमी वेळेत लॅपटॉप उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 

आधार परिवाराची सोनवणे कुटुंबाला पावलोपावली साथ मिळते. आधारने केलेल्या अनमोल मदतीसाठी आमचे शब्द देखील कमी पडतील.

पुन्हा एकदा आधार समन्वयक आणि समुपदेशन ग्रुपचे मनापासून आभार.

दिपाली सोनवणे.

संगमनेर

--------------------------------------

दिपाली आधार कार्यालयात काम करते. ती एम. कॉम पुणे विद्यापीठ गोल्ड मेडलिस्ट असून विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे.

मोठी बहीण मोनाली MSc Bed. देवकी-B.com तर सोनाली M.Farm झाली असून Phd साठी पात्र झाली आहे. पण पैशांअभावी ती पीएचडी पूर्ण करु शकत नाही.

   वेल्डींग काम करत असलेले वडीलांचे चार महिन्यापूर्वी हदय विकाराने निधन झाल्याने सोनवणे परिवारावर फार मोठा आघात झाला होता. मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करणारा बाप.घरातील एकमेक कर्ता माणूस गेल्यावर पाच बहिणी एक भाऊ व आई अशा परिवाराला आधाराची गरज होती.


अत्यंत प्रतिभावान बहिणी़ची दखल आधारने घेतली. दिपाली आता आधारमध्ये सात हजार मानधन घेत काम करते.सोनाली बी फार्म सी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी करते.

गायत्रीला नाशिकच्या आधारने शैक्षणिक दत्तक घेतले .तर विजयची जबाबदारी आधार संगमनेरने घेतली आहे.

गायत्रीच्या लॅपटॉपसाठी आपण अनेक संस्थांना अवाहन केले होते.पण प्रतिसाद आला नाही. 

    गायत्रीला प्रोग्रामिंगसाठी लॅपटॉपची खूप गरज होती. आधार समुपदेशक डॉ. चित्रलेखा देशमुख, वैशाली देशमुख,डॉ. महादेव अरगडे, पी डी सोनवणे, अनिल कडलग, सोमनाथ मदने,लक्ष्मण कोते, सुखदेव इल्हे इ समन्वयक यांचे उपस्थितीत गायत्रीला लॅपटॉप दिला.

गायत्रीला लॅपटॉप मिळताच, तिची कळी खुलली. बहीण दिपाली सुखावली. मागील वर्षी खूप अडचणी असताना गायत्रीला 9.11 रँक मिळाली. यावर्षी ती *टॉपर* राहील यात शंका नाही.


शब्दांकन-सुखदेव इल्हे, आधार


Read More

"कृषीतंत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आधारने दिली मदत"

No comments:

 विशाल रामदास इल्हे.

 मु. पो. तळेगाव दिघे. ता- संगमनेर 

(ABM 3rd year)

Agriculture Business Management


आई- मजूरी तर वडील रस्त्यावर चप्पल शिवण्याचे काम करतात.

 विशाल १२वी पासुन आधार दत्तक पालक योजनेतून शिकतो.


गेली तीन वर्षापासून विशाल एका कृषी दुकानात पार्ट टाईम काम करतो.

त्यामुळे घराला व शिक्षणाला हातभार लागतो.


तृतीय वर्षे नुकतेच सुरु झाले असून कॉलेज फी भरण्यासाठी विशालला १०,०००₹ परतफेडीची मदत म्हणून दिली.

कुठल्याही प्रकारचे चार्ज न घेत . शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही मूलं घेतलेली मदत परत करणार आहेत.


विशालला पूढील शिक्षणासाठी शुभेच्छा.

Read More

"अत्यंत होतकरू भावी शिक्षकेस आधारने दिला आधार"

No comments:

 कल्पना मनोहर कोकणे.

मु. पो. धांदरफळ खुर्द, ता - संगमनेर .

Bsc.Bed द्वितीय वर्ष 

अत्यंत होतकरू भावी शिक्षिका.

वडील नाहीत. परिस्थितीमूळे भावाचे शिक्षण अर्धवट राहिले.

आई मजुरी करून घर चालवते.भाऊ मालपाणीमध्ये काम करतो.

आधारने तीन वर्षांपासून तिला दत्तक पालक योजनेत शिक्षणासाठी मदत दिली.

आज दुसऱ्या वर्षाच्या फी साठी 

आधारने नुकताच 5000 ₹ चा चेक,वह्या,  पेन,सॅक आदी मदत करत प्रोत्साहन दिले.

कल्पनाने आधीच ठरविले की, नोकरीला लागले की , पहिली मदत आधारला करणार.

तीन वर्षापुर्वी एस वाय बीएस्सी ला 81% असूनही कॉलेज बंद करण्याची वेळ तिच्यावर आली होती .


कल्पना

भावी शिक्षिकेसाठी आधारच्या खूप खूप शुभेच्छा



.


Read More

"चिन्मयला आधार मिळाला.. शिक्षण पुन्हा सुरु झाले"

No comments:

चिन्मय विजय  परदेशी 

AISSM POLYTECHNIC College Pune

येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा करत आहे. वडील वयोवृद्ध असून एका खाजगी कंपनीत सेवा केल्याने एक हजार पेंशन मिळते.


सदर परिवार सोमवार पेठ, पुणे येथे येथे राहते.शेजारी केईएम हॉस्पिटल आहे. चिन्मयची आई वैशाली परदेशी पेशंटचे डबे तयार करायच्या, कुटुंब चालायचे.

पण गेल्या आठ महिन्यापुर्वी वैशाली ताई पडल्या. मनक्याचे आपरेशन सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झाले. खूप खर्च झाला. आर्थिक गणित कोलमडून गेलं. जगणचं मुस्कील झालं.. 

चिन्मयपुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला. आईला उठता येत नाही. ती डबे करू शकत नाही. पैसे भरले नसल्याने चिन्मयचे कॉलेज बंद झाले.

चिन्मय परदेशी याचा अर्ज आधार सदस्य हरीभाऊ खामकर साहेब यांचे माध्यमातून नुकताच प्राप्त झाला. परिस्थितीची खात्री केली.

आधार कोअर कमिटीची संमती मिळताच ,आज 8000 ₹ आरटीजीएस करत या गरजू मुलाला उपलब्ध करून दिले.

 एक गरजू मुलगा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाताना वाचला. एका कुटुंबाला आधार मिळाला. 

चिन्मय एक जिद्दी मुलगा आहे. मागच्या सेमिस्टरला त्याला 81%मिळाले होते. "सर, मुलगा नोकरीला लागला की, आधारचे सर्व पैसे परत करील".  

आधार कठीण प्रसंगी माझ्या पाठीशी उभा राहिला, कुणीच मदत करीत नव्हते. 

आधारच्या रूपाने पांडुरंग धाऊन आला... हे सांगताना वैशालीताई यांचा आवाज कंप पावला होता. डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.


चिन्मयच्या भावी जीवनासाठी हार्दीक शुभेच्छा.


सुखदेव इल्हे,आधार समन्वयक.



Read More

"निराधार मुलाला आधार फाउंडेशनने दिला आधार"

No comments:


 कुणाल संतोष महाबरे.

महाबरेवाडी, नारायणगाव  जिल्हा- पुणे


वडील व्यसनी तर आईने आत्महत्या केली. आज दोघेही नाहीत.

कुणाल मंगळापुर  संगमनेर येथे मामाकडे शिकतो.तेही हातावर आहेत.

कुणाल आठवीपासून *आधार शैक्षणिक दत्तक पालक* योजनेत शिकतो.

   यावर्षी कुणाल बारावी सायन्सला आहे. प्रवेशासाठी आधारने नुकताच त्याला 3000 ₹ चा चेक  सह्याद्री कॉलेजच्या नावे दिला.

आजारी असल्याने थोडे मार्क्स कमी पडले. पण जिद्द व चिकाटी चांगली आहे.

यावर्षी नक्कीच चांगले यश मिळविणं याची तो खात्री देतो.


एका निराधार मुलांच्या पंखांना आपण नक्की बळ देऊया.


Read More

Wednesday, October 13, 2021

"उमेशचे एमबीबीएस चालू... दर महिण्याच्या मेससाठी 4500₹ ची अनमोल मदत"

No comments:


"डॉ.चित्रलेखा देशमुख यांचे दातृत्व"

    दोन वर्षापुर्वी उमेश कातोरे नावाचा आदिवासी मुलगा आधारच्या मदतीने  "NEET" सुटला. "IIT" ही Qualify झाला. कोटा वारी न करता. जिथं पुस्तके घ्यायलाचं पैसा नाही,  तिथं मार्गदर्शन क्लास तरी  काय उपलब्ध असेल. जिथं दोन वेळच्या खायची पंचायत, तिथं  उमेशने बाकीच्या सुविधांचा विचारही केला नाही.

डॉ. महादेव अरगडे यांनीच वरील दोन्ही फार्म भरले आणि उमेशने जिकडे पैसा कमी लागेल तिकडे प्रवेश घ्यायचा ठरविले.

आधारने 10 हजार रुपये दिले. अन् उमेशने मुंबईतील "Grant Medical College" मध्ये प्रवेश घेतला.

 पहिले वर्ष सुरू झालं, उमेश हजर झाला. पहिल्यांदाच मुंबईला गेलेला उमेश थोडा दबला मेसचा खर्च पाच हजारापर्यंत जाऊ लागला, तो त्याच्या बजेटचा बाहेर गेला आता  काय करायचे ? आभाळचं फाटलयं कुठं कुठ शिवायचं ?

उमेशनं परिस्थितीनुसार मार्ग शोधून काढला. फक्त एकच वेळेस दुपारी जेवायचं. फारच भूक लागली तर एखादा वडा खायचा अन् भरपूर पाणी प्यायचं. 

 दुसरे वर्ष सुरु होणार होतं. उमेश वह्या इतर साहित्य घेण्यासाठी आला. 

काही अडचण विचारली असता नाही सर, काहीच नाही. चांगले चालले आहे. " जेवण" 

उमेश काहीच बोलेना...

"कँटीनमध्ये... मेससाठी दररोज किमान 150 ₹ तरी लागतात. एवढे आणायचे कुठून ?"

हाच मोठा प्रश्न मी आधार ग्रूपवर मांडला. दर वर्षी किमान 50 हजार तरी लागणार होते. आधार एवढा खर्च करू शकत नव्हते.

डॉ. चित्रलेखा देशमुख उमेशशी बोलल्या, खूपच संवेदनशील, हळव्या असलेल्या ताईंनी मला फोन करून सांगितले. 

सर, मी उमेशच्या जेवणाचा खर्च उचलते. "किती मोठ्ठं मनं...अन् दातृत्व सुद्धा !! हे रक्तातच लागतं". दरवर्षी त्या अशाच गरजू कृष्णा कडवला मदत करत होत्या. तो आता MBBS नंतर PG झाला. मी उमेशला मदत करू शकते असं सांगितले.

नूकतचं लॉकडाउन नंतर उमेशच कॉलेज सुरू झालं. सुट्टीत उमेशने मजूरीने कामाला जाऊन थोडेफार पैसे कमवले. आधारने यावर्षीही त्याची 10 हजार शिक्षण फी भरली. आता नक्कीच दोन वर्षात आदिवासी समाजाच लेकरु MBBS होईल. आधारचा पहिला MBBS DOCTOR !

  एक चांगला प्रतिभासंपन्न "कवीमन" असलेला डॉक्टर. उमेशने नुकतीच महाराष्ट्र अँथेलॅटिक चॅम्पियन जिंकली. त्याची अभ्यासातही खूप चांगली प्रगती आहे. 

     साधी राहणी,उच्च विचारसरणी असलेल्या उमेशच्या पोटात पोटभरं अन्न असलं म्हणजे अभ्यासाला आणखी मनं लागेल. आधार समुपदेशक डॉ. चित्रलेखा देशमुख यांच्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला. 

आधार परिवाराच्या वतीने ताईंना खूप खूप धन्यवाद!


शब्दांकन

सुखदेव इल्हे, आधार

9422332572


Read More

Monday, October 4, 2021

"आधार" मिळाला अन् सुवर्णा झाली इंजिनिअर.

No comments:




"पैसे नसल्याने इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्धवट सोडण्याची वेळ आली होती. पण आधारचे सुखदेव इल्हे सर भेटले,अन् संधीचे सोने झाले."

सुवर्णा भागवत गोर्डे 
अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव देशमुख ता.कोपरगाव हे दुष्काळी पट्टयातील गाव.निसर्गाने साथ दिली तर शेती.नाहीतर खायचे हाल. सुवर्णाला मोठ्या तीन बहिणी. वडील शेतकरी... आई गृहिणी.. शेळ्यापालन.. शेतीत छोटे-मोठे काम करत घराला मदत करायची.

  मोठ्या दोन बहिणी अनिता,वनिता कशाबशा बारावी शिकल्या. पण पैशाअभावी हुशार असताना शाळा सोडायला लागली. वडिलांनी त्यांचे लग्न करून दिले.
जोस्ना फार संघर्षातून बीएस्सी झाली. माझा संगमनेर येथील इथापे कॉलेजला डिप्लोमा इंजिनिअरिंगला नंबर लागला.प्रवेशही घेतला. पण परिस्थितीमुळे दररोज कॉलेज करणे शक्य नव्हते. कॉलेज बंद करण्याचा विचार मनात येई.  

कसंबस डिप्लोमा झाला. पण उच्च शिक्षण कसे घ्यायचे ?  अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजवर आधारची माहिती मिळाली. सुखदेव इल्हे सरांचा फोन मिळाला. अन् भेट घेत अडचण सांगितली. "सर, मला इंजिनिअर व्हायचंय, आधारतर्फे तुम्ही मदत करा." हे सांगताना सुवर्णाच्या डोळ्यात पाणी होते. अन् बोलण्यात जिद्द होती.

विठ्ठल वाव्हळ, सेवाभावी व्यक्तीमत्व यांच्या कानावर सुवर्णाची  अडचण सांगितली. त्यांनी तात्काळ 10 हजाराचा चेक दिला.एवढेच नाही तर सुवर्णाला राहण्यासाठी स्वतःचे घरही उपलब्ध करूण देण्याची तयारी दाखवली.

आधारने  सुवर्णाला दत्तक घेतले. तिने अमृतवाहिनी इंजिनिअरिंगला  प्रवेश घेतला. मालपाणी फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मनिष मालपाणी यांनी सुवर्णाची परिस्थिती सांगितली. तिची जिद्द व चिकाटी आधारची शिफारस यामुळे सुवर्णाला दरवर्षी 30 हजाराची शिष्यवृत्ती (परतफेडीचे 0% दराचे कर्ज)उपलब्ध करून दिले. राधेश्याम राठी यांनी यासाठी पूर्ण सहकार्य केले.आधारने वह्या पुस्तके व इतर मदत केली. सुवर्णा चांगल्या गुणांनी बीई मॅकेनिकल झाली.

आज सुवर्णा पुण्यात इंजिनिअर म्हणून आत्मविश्वासिने काम करत आहे.नुकतेच तिला Medline India pune या ठिकाणी 4.5 लाखाचे package मिळाले आहे.

जिद्द, चिकाटी व प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही. हे सुवर्णा गोर्डे हीने सिद्ध केले आहे.
एका दुष्काळी भागातील शेतकऱ्याची मुलगी इंजिनिअर झाली. आधारने तिच्या जिद्दीला बळ दिले. सुवर्णाला  भाऊ नाही. तीच आई-वडिलांचा आधार होणार आहे. मालपाणी फाऊंडेशन व आधारनं केलेली मदत तिला परत करायची आहे.

एवढेच नाही तर.. स्वतःच्या कुटुंबाला उभं केल्यावर तिच्यासारख्याच एका गरजू मुलीला ती दत्तक घेत मदत करणार आहे.
सुवर्णा म्हणते, "मी आज खूप आनंदी व समाधानी आहे".  आधारनं माझ्यासाठी खूप केलं. मला ज्यांनी मदत केली, त्यांना मी जीवनभर कधीच विसरणार नाही.  मी कितीही पुढं गेली तरी मागं वळून पाहणार आहे,माझ्या मागे रांगेत असणा-या बहिण भावांना मदत करण्यासाठी...

सुवर्णा संपर्क-7720065012
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शब्दांकन-सुखदेव इल्हे
आधार-9422332572
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
Attachments area
Read More

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.