DONATE NOW

Monday, October 4, 2021

"आधार" मिळाला अन् सुवर्णा झाली इंजिनिअर.




"पैसे नसल्याने इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्धवट सोडण्याची वेळ आली होती. पण आधारचे सुखदेव इल्हे सर भेटले,अन् संधीचे सोने झाले."

सुवर्णा भागवत गोर्डे 
अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव देशमुख ता.कोपरगाव हे दुष्काळी पट्टयातील गाव.निसर्गाने साथ दिली तर शेती.नाहीतर खायचे हाल. सुवर्णाला मोठ्या तीन बहिणी. वडील शेतकरी... आई गृहिणी.. शेळ्यापालन.. शेतीत छोटे-मोठे काम करत घराला मदत करायची.

  मोठ्या दोन बहिणी अनिता,वनिता कशाबशा बारावी शिकल्या. पण पैशाअभावी हुशार असताना शाळा सोडायला लागली. वडिलांनी त्यांचे लग्न करून दिले.
जोस्ना फार संघर्षातून बीएस्सी झाली. माझा संगमनेर येथील इथापे कॉलेजला डिप्लोमा इंजिनिअरिंगला नंबर लागला.प्रवेशही घेतला. पण परिस्थितीमुळे दररोज कॉलेज करणे शक्य नव्हते. कॉलेज बंद करण्याचा विचार मनात येई.  

कसंबस डिप्लोमा झाला. पण उच्च शिक्षण कसे घ्यायचे ?  अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजवर आधारची माहिती मिळाली. सुखदेव इल्हे सरांचा फोन मिळाला. अन् भेट घेत अडचण सांगितली. "सर, मला इंजिनिअर व्हायचंय, आधारतर्फे तुम्ही मदत करा." हे सांगताना सुवर्णाच्या डोळ्यात पाणी होते. अन् बोलण्यात जिद्द होती.

विठ्ठल वाव्हळ, सेवाभावी व्यक्तीमत्व यांच्या कानावर सुवर्णाची  अडचण सांगितली. त्यांनी तात्काळ 10 हजाराचा चेक दिला.एवढेच नाही तर सुवर्णाला राहण्यासाठी स्वतःचे घरही उपलब्ध करूण देण्याची तयारी दाखवली.

आधारने  सुवर्णाला दत्तक घेतले. तिने अमृतवाहिनी इंजिनिअरिंगला  प्रवेश घेतला. मालपाणी फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मनिष मालपाणी यांनी सुवर्णाची परिस्थिती सांगितली. तिची जिद्द व चिकाटी आधारची शिफारस यामुळे सुवर्णाला दरवर्षी 30 हजाराची शिष्यवृत्ती (परतफेडीचे 0% दराचे कर्ज)उपलब्ध करून दिले. राधेश्याम राठी यांनी यासाठी पूर्ण सहकार्य केले.आधारने वह्या पुस्तके व इतर मदत केली. सुवर्णा चांगल्या गुणांनी बीई मॅकेनिकल झाली.

आज सुवर्णा पुण्यात इंजिनिअर म्हणून आत्मविश्वासिने काम करत आहे.नुकतेच तिला Medline India pune या ठिकाणी 4.5 लाखाचे package मिळाले आहे.

जिद्द, चिकाटी व प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही. हे सुवर्णा गोर्डे हीने सिद्ध केले आहे.
एका दुष्काळी भागातील शेतकऱ्याची मुलगी इंजिनिअर झाली. आधारने तिच्या जिद्दीला बळ दिले. सुवर्णाला  भाऊ नाही. तीच आई-वडिलांचा आधार होणार आहे. मालपाणी फाऊंडेशन व आधारनं केलेली मदत तिला परत करायची आहे.

एवढेच नाही तर.. स्वतःच्या कुटुंबाला उभं केल्यावर तिच्यासारख्याच एका गरजू मुलीला ती दत्तक घेत मदत करणार आहे.
सुवर्णा म्हणते, "मी आज खूप आनंदी व समाधानी आहे".  आधारनं माझ्यासाठी खूप केलं. मला ज्यांनी मदत केली, त्यांना मी जीवनभर कधीच विसरणार नाही.  मी कितीही पुढं गेली तरी मागं वळून पाहणार आहे,माझ्या मागे रांगेत असणा-या बहिण भावांना मदत करण्यासाठी...

सुवर्णा संपर्क-7720065012
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शब्दांकन-सुखदेव इल्हे
आधार-9422332572
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
Attachments area

No comments:

Post a Comment

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.