DONATE NOW

Friday, October 22, 2021

"बाल मूर्तिकार रेवणनाथ नवलेला आधारने घेतले दत्तक"

   तालुक्यातील मालदाड येथील बाल मूर्तिकार रेवणनाथ नवले या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर नुकताच प्रसारित झाला.

 त्यामध्ये हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक अध्ययनापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले. 

कारण कोविड-१९ या आजाराच्या  प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण चालू आहे.

 भूमीहीन असणारे,अपघाताने दिव्यांग झालेली वडील सध्या काम नसल्याने घरीच आहेत. आई मोलमजुरी करते, अशात अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी पैसे कुठून आणणार? 

घरात खाणारी तोंड पाच अशाही परिस्थितीत उपजतच शिल्पकलेचे ज्ञान अवगत असलेला रेवणनाथ हा त्यांचा मोठा मुलगा इयत्ता सहावीत शिकतोय वयाने लहान असला तरी फोटो पाहून हुबेहूब मूर्ती बनविण्याचे कसब त्याच्या अंगी आहे 

जणू काही एखादा निष्णात कलाकारच मूर्तिकार असावा, अशा मूर्ती स्वतःच्या हाताने कोणतेही यांत्रिक साहित्य न वापरता तो तयार करतोय, रंगवतोय.

याची चाहूल त्याच्या मुख्याध्यापकांना गृह भेटीदरम्यान लागली. त्यांनी मूर्ती बनवत असतानाचा एक व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर अपलोड केला.

 त्यानंतर हा व्हिडिओ आधारचे शिलेदार बाळासाहेब गडाख व आधारचे समन्वयक अनिल कडलग यांच्या पाहण्यात आला. 

त्यांनी आधार समन्वयकांशी चर्चा करून सुरुवातीला त्याच्या शैक्षणिक  गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे सुचवले. 

सर्व परिस्थिती समजावून घेत आधार समन्वयकांनी या विद्यार्थ्यांची आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेसाठी निवड केली.

 त्यानंतर कॉर्नर मोबाईल शॉपीचे संचालक संजय अभंग यांच्या सहकाऱ्याने आधार फाउंडेशनने रेवननाथला  ऑनलाईन शिक्षणासाठी एक अँड्रॉइड मोबाईल घेतला. 

तसेच शालेय उपयोगी साहित्य, स्कूल बॅग, गणवेश, शूज  आदि साहित्यासह आधार समन्वयकांनी रेवणनाथचे घर गाठले.  

सोबतच शिल्पकार सुनील मादास हे ही होते.  त्यांनी या बाल मूर्तिकारांची शिल्पकला पाहून त्याला त्याच्या आयुष्यात शिल्पकार बनण्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींसाठी मदत करण्याचं जाहीर केलं. 

आधारची ही भेट पाहून रेवणनाथसह त्याचे कुटुंबीय भारावून गेले. आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेअंतर्गत रेवणनाथच्या पुढील शिक्षणाची सर्व जबाबदारी आधार फाउंडेशनने उचलली आहे.

यासाठी आधारचे मार्गदर्शक साहेबराव नवले यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.आणखी काही सामाजिक संस्थानी मदत केल्यास गरजू व होतकरू कुटुंबाच्या प्रगतीसाठी रेवणनाथ भविष्यात नक्कीच उंची गाठू शकेल.

   याप्रसंगी आधारचे समन्वयक सोमनाथ मदने, अनिल कडलग, बाळासाहेब गडाख, सुनिल मादास,सुखदेव गाडेकर,सरपंच गोरक्ष नवले,

श्रमशक्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास डोंगरे, गोपीनाथ नवले, निलेश नवले, सचिन नवले, जालिंदर नवले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.