DONATE NOW

Wednesday, October 13, 2021

"उमेशचे एमबीबीएस चालू... दर महिण्याच्या मेससाठी 4500₹ ची अनमोल मदत"


"डॉ.चित्रलेखा देशमुख यांचे दातृत्व"

    दोन वर्षापुर्वी उमेश कातोरे नावाचा आदिवासी मुलगा आधारच्या मदतीने  "NEET" सुटला. "IIT" ही Qualify झाला. कोटा वारी न करता. जिथं पुस्तके घ्यायलाचं पैसा नाही,  तिथं मार्गदर्शन क्लास तरी  काय उपलब्ध असेल. जिथं दोन वेळच्या खायची पंचायत, तिथं  उमेशने बाकीच्या सुविधांचा विचारही केला नाही.

डॉ. महादेव अरगडे यांनीच वरील दोन्ही फार्म भरले आणि उमेशने जिकडे पैसा कमी लागेल तिकडे प्रवेश घ्यायचा ठरविले.

आधारने 10 हजार रुपये दिले. अन् उमेशने मुंबईतील "Grant Medical College" मध्ये प्रवेश घेतला.

 पहिले वर्ष सुरू झालं, उमेश हजर झाला. पहिल्यांदाच मुंबईला गेलेला उमेश थोडा दबला मेसचा खर्च पाच हजारापर्यंत जाऊ लागला, तो त्याच्या बजेटचा बाहेर गेला आता  काय करायचे ? आभाळचं फाटलयं कुठं कुठ शिवायचं ?

उमेशनं परिस्थितीनुसार मार्ग शोधून काढला. फक्त एकच वेळेस दुपारी जेवायचं. फारच भूक लागली तर एखादा वडा खायचा अन् भरपूर पाणी प्यायचं. 

 दुसरे वर्ष सुरु होणार होतं. उमेश वह्या इतर साहित्य घेण्यासाठी आला. 

काही अडचण विचारली असता नाही सर, काहीच नाही. चांगले चालले आहे. " जेवण" 

उमेश काहीच बोलेना...

"कँटीनमध्ये... मेससाठी दररोज किमान 150 ₹ तरी लागतात. एवढे आणायचे कुठून ?"

हाच मोठा प्रश्न मी आधार ग्रूपवर मांडला. दर वर्षी किमान 50 हजार तरी लागणार होते. आधार एवढा खर्च करू शकत नव्हते.

डॉ. चित्रलेखा देशमुख उमेशशी बोलल्या, खूपच संवेदनशील, हळव्या असलेल्या ताईंनी मला फोन करून सांगितले. 

सर, मी उमेशच्या जेवणाचा खर्च उचलते. "किती मोठ्ठं मनं...अन् दातृत्व सुद्धा !! हे रक्तातच लागतं". दरवर्षी त्या अशाच गरजू कृष्णा कडवला मदत करत होत्या. तो आता MBBS नंतर PG झाला. मी उमेशला मदत करू शकते असं सांगितले.

नूकतचं लॉकडाउन नंतर उमेशच कॉलेज सुरू झालं. सुट्टीत उमेशने मजूरीने कामाला जाऊन थोडेफार पैसे कमवले. आधारने यावर्षीही त्याची 10 हजार शिक्षण फी भरली. आता नक्कीच दोन वर्षात आदिवासी समाजाच लेकरु MBBS होईल. आधारचा पहिला MBBS DOCTOR !

  एक चांगला प्रतिभासंपन्न "कवीमन" असलेला डॉक्टर. उमेशने नुकतीच महाराष्ट्र अँथेलॅटिक चॅम्पियन जिंकली. त्याची अभ्यासातही खूप चांगली प्रगती आहे. 

     साधी राहणी,उच्च विचारसरणी असलेल्या उमेशच्या पोटात पोटभरं अन्न असलं म्हणजे अभ्यासाला आणखी मनं लागेल. आधार समुपदेशक डॉ. चित्रलेखा देशमुख यांच्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला. 

आधार परिवाराच्या वतीने ताईंना खूप खूप धन्यवाद!


शब्दांकन

सुखदेव इल्हे, आधार

9422332572


No comments:

Post a Comment

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.