Friday, October 22, 2021
"कृषीतंत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आधारने दिली मदत"
विशाल रामदास इल्हे.
मु. पो. तळेगाव दिघे. ता- संगमनेर
(ABM 3rd year)
Agriculture Business Management
आई- मजूरी तर वडील रस्त्यावर चप्पल शिवण्याचे काम करतात.
विशाल १२वी पासुन आधार दत्तक पालक योजनेतून शिकतो.
गेली तीन वर्षापासून विशाल एका कृषी दुकानात पार्ट टाईम काम करतो.
त्यामुळे घराला व शिक्षणाला हातभार लागतो.
तृतीय वर्षे नुकतेच सुरु झाले असून कॉलेज फी भरण्यासाठी विशालला १०,०००₹ परतफेडीची मदत म्हणून दिली.
कुठल्याही प्रकारचे चार्ज न घेत . शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही मूलं घेतलेली मदत परत करणार आहेत.
विशालला पूढील शिक्षणासाठी शुभेच्छा.
"अत्यंत होतकरू भावी शिक्षकेस आधारने दिला आधार"
कल्पना मनोहर कोकणे.
मु. पो. धांदरफळ खुर्द, ता - संगमनेर .
Bsc.Bed द्वितीय वर्ष
अत्यंत होतकरू भावी शिक्षिका.
वडील नाहीत. परिस्थितीमूळे भावाचे शिक्षण अर्धवट राहिले.
आई मजुरी करून घर चालवते.भाऊ मालपाणीमध्ये काम करतो.
आधारने तीन वर्षांपासून तिला दत्तक पालक योजनेत शिक्षणासाठी मदत दिली.
आज दुसऱ्या वर्षाच्या फी साठी
आधारने नुकताच 5000 ₹ चा चेक,वह्या, पेन,सॅक आदी मदत करत प्रोत्साहन दिले.
कल्पनाने आधीच ठरविले की, नोकरीला लागले की , पहिली मदत आधारला करणार.
तीन वर्षापुर्वी एस वाय बीएस्सी ला 81% असूनही कॉलेज बंद करण्याची वेळ तिच्यावर आली होती .
कल्पना
भावी शिक्षिकेसाठी आधारच्या खूप खूप शुभेच्छा
.
"चिन्मयला आधार मिळाला.. शिक्षण पुन्हा सुरु झाले"
चिन्मय विजय परदेशी
AISSM POLYTECHNIC College Pune
येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा करत आहे. वडील वयोवृद्ध असून एका खाजगी कंपनीत सेवा केल्याने एक हजार पेंशन मिळते.
सदर परिवार सोमवार पेठ, पुणे येथे येथे राहते.शेजारी केईएम हॉस्पिटल आहे. चिन्मयची आई वैशाली परदेशी पेशंटचे डबे तयार करायच्या, कुटुंब चालायचे.
पण गेल्या आठ महिन्यापुर्वी वैशाली ताई पडल्या. मनक्याचे आपरेशन सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झाले. खूप खर्च झाला. आर्थिक गणित कोलमडून गेलं. जगणचं मुस्कील झालं..
चिन्मयपुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला. आईला उठता येत नाही. ती डबे करू शकत नाही. पैसे भरले नसल्याने चिन्मयचे कॉलेज बंद झाले.
चिन्मय परदेशी याचा अर्ज आधार सदस्य हरीभाऊ खामकर साहेब यांचे माध्यमातून नुकताच प्राप्त झाला. परिस्थितीची खात्री केली.
आधार कोअर कमिटीची संमती मिळताच ,आज 8000 ₹ आरटीजीएस करत या गरजू मुलाला उपलब्ध करून दिले.
एक गरजू मुलगा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाताना वाचला. एका कुटुंबाला आधार मिळाला.
चिन्मय एक जिद्दी मुलगा आहे. मागच्या सेमिस्टरला त्याला 81%मिळाले होते. "सर, मुलगा नोकरीला लागला की, आधारचे सर्व पैसे परत करील".
आधार कठीण प्रसंगी माझ्या पाठीशी उभा राहिला, कुणीच मदत करीत नव्हते.
आधारच्या रूपाने पांडुरंग धाऊन आला... हे सांगताना वैशालीताई यांचा आवाज कंप पावला होता. डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
चिन्मयच्या भावी जीवनासाठी हार्दीक शुभेच्छा.
सुखदेव इल्हे,आधार समन्वयक.
"निराधार मुलाला आधार फाउंडेशनने दिला आधार"
कुणाल संतोष महाबरे.
महाबरेवाडी, नारायणगाव जिल्हा- पुणे
वडील व्यसनी तर आईने आत्महत्या केली. आज दोघेही नाहीत.
कुणाल मंगळापुर संगमनेर येथे मामाकडे शिकतो.तेही हातावर आहेत.
कुणाल आठवीपासून *आधार शैक्षणिक दत्तक पालक* योजनेत शिकतो.
यावर्षी कुणाल बारावी सायन्सला आहे. प्रवेशासाठी आधारने नुकताच त्याला 3000 ₹ चा चेक सह्याद्री कॉलेजच्या नावे दिला.
आजारी असल्याने थोडे मार्क्स कमी पडले. पण जिद्द व चिकाटी चांगली आहे.
यावर्षी नक्कीच चांगले यश मिळविणं याची तो खात्री देतो.
एका निराधार मुलांच्या पंखांना आपण नक्की बळ देऊया.
Wednesday, October 13, 2021
"उमेशचे एमबीबीएस चालू... दर महिण्याच्या मेससाठी 4500₹ ची अनमोल मदत"
"डॉ.चित्रलेखा देशमुख यांचे दातृत्व"
दोन वर्षापुर्वी उमेश कातोरे नावाचा आदिवासी मुलगा आधारच्या मदतीने "NEET" सुटला. "IIT" ही Qualify झाला. कोटा वारी न करता. जिथं पुस्तके घ्यायलाचं पैसा नाही, तिथं मार्गदर्शन क्लास तरी काय उपलब्ध असेल. जिथं दोन वेळच्या खायची पंचायत, तिथं उमेशने बाकीच्या सुविधांचा विचारही केला नाही.
डॉ. महादेव अरगडे यांनीच वरील दोन्ही फार्म भरले आणि उमेशने जिकडे पैसा कमी लागेल तिकडे प्रवेश घ्यायचा ठरविले.
आधारने 10 हजार रुपये दिले. अन् उमेशने मुंबईतील "Grant Medical College" मध्ये प्रवेश घेतला.
पहिले वर्ष सुरू झालं, उमेश हजर झाला. पहिल्यांदाच मुंबईला गेलेला उमेश थोडा दबला मेसचा खर्च पाच हजारापर्यंत जाऊ लागला, तो त्याच्या बजेटचा बाहेर गेला आता काय करायचे ? आभाळचं फाटलयं कुठं कुठ शिवायचं ?
उमेशनं परिस्थितीनुसार मार्ग शोधून काढला. फक्त एकच वेळेस दुपारी जेवायचं. फारच भूक लागली तर एखादा वडा खायचा अन् भरपूर पाणी प्यायचं.
दुसरे वर्ष सुरु होणार होतं. उमेश वह्या इतर साहित्य घेण्यासाठी आला.
काही अडचण विचारली असता नाही सर, काहीच नाही. चांगले चालले आहे. " जेवण"
उमेश काहीच बोलेना...
"कँटीनमध्ये... मेससाठी दररोज किमान 150 ₹ तरी लागतात. एवढे आणायचे कुठून ?"
हाच मोठा प्रश्न मी आधार ग्रूपवर मांडला. दर वर्षी किमान 50 हजार तरी लागणार होते. आधार एवढा खर्च करू शकत नव्हते.
डॉ. चित्रलेखा देशमुख उमेशशी बोलल्या, खूपच संवेदनशील, हळव्या असलेल्या ताईंनी मला फोन करून सांगितले.
सर, मी उमेशच्या जेवणाचा खर्च उचलते. "किती मोठ्ठं मनं...अन् दातृत्व सुद्धा !! हे रक्तातच लागतं". दरवर्षी त्या अशाच गरजू कृष्णा कडवला मदत करत होत्या. तो आता MBBS नंतर PG झाला. मी उमेशला मदत करू शकते असं सांगितले.
नूकतचं लॉकडाउन नंतर उमेशच कॉलेज सुरू झालं. सुट्टीत उमेशने मजूरीने कामाला जाऊन थोडेफार पैसे कमवले. आधारने यावर्षीही त्याची 10 हजार शिक्षण फी भरली. आता नक्कीच दोन वर्षात आदिवासी समाजाच लेकरु MBBS होईल. आधारचा पहिला MBBS DOCTOR !
एक चांगला प्रतिभासंपन्न "कवीमन" असलेला डॉक्टर. उमेशने नुकतीच महाराष्ट्र अँथेलॅटिक चॅम्पियन जिंकली. त्याची अभ्यासातही खूप चांगली प्रगती आहे.
साधी राहणी,उच्च विचारसरणी असलेल्या उमेशच्या पोटात पोटभरं अन्न असलं म्हणजे अभ्यासाला आणखी मनं लागेल. आधार समुपदेशक डॉ. चित्रलेखा देशमुख यांच्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला.
आधार परिवाराच्या वतीने ताईंना खूप खूप धन्यवाद!
शब्दांकन
सुखदेव इल्हे, आधार
9422332572
Monday, October 4, 2021
"आधार" मिळाला अन् सुवर्णा झाली इंजिनिअर.
















Friday, May 17, 2019
मा. राजाभाऊ भांडगे यांचे मुलाचे विवाह निमित्त ₹५०००चा चेक दिला.
सत्काराला फाटा देत आधारला दिली लाख मोलाची मदत..!
आधार फाऊंडेशन संगमनेर परिवार भांडगे परिवाराच्या ॠणातच.....!!
