DONATE NOW

Tuesday, January 25, 2022

"आधार शैक्षणिक दत्तक विद्यार्थिनीस मदत "

No comments:

 

पायल संजय घोडेकर

12वी, सायन्स

ओहरा कॉलेज,संगमनेर

 

अतिशय, हुशार मुलगी

एका डोळ्याचे ३ आपरेशन झालेत. वडिलांनी लाखो रुपये खर्च केला. वडील फिटर ...

 चार वर्षापासून आधार दत्तक पालक योजनेतून शिकते.

मागील वर्षी अक्षरभारती पुणे या संस्थेतर्फे तिला लॅपटॉप दिला. तिला खूप अडचणी असताना, अभ्यासाची बरीच दिवस वाया गेलेले असताना दहावीला 88.89 % मिळाले.

चश्मा तुटल्याने व काचाही खराब झाल्याने तिला दिसायला अडचण आली होती.

"मला यावर्षी सॅक,शूज नको, त्याऐवजी चश्मा नीट करून द्या." असं तीचं म्हणनं होतं. पायलची अडचण ओळखून तिला

नयन चश्मा संगमनेर येथून तात्काळ चांगल्या दर्जाचा नवीन चश्मा होलसेल दरात घेऊन दिला.

पायलला स्पर्धा परिक्षेतून कलेक्टर व्हायचे आहे.आधार समुपदेशक डॉ. चित्रलेखा, वैशाली ताई,पीएसआय मृणाल पवार यांचे सतत तिला मार्गदर्शन मिळत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Read More

”आत्महत्याग्रस्त बटुळे कुटुंबातील भावंडांना आधारची मोलाची मदत”

No comments:

 

      साधारण दोन वर्षे झालीत. वडील मल्हारी बटुळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. उसतोडणी कामगार असलेलं कुटुंब रस्त्यावर आलं. घरातील वयोवृद्ध आजोबांवर कुटुंबाची जबाबदारी आली. विशेष म्हणजे प्रशांत तेंव्हा तिसरीतच होता. त्याने आपल्या स्वरचित कवितेतून शेतकरी दादाला आत्महत्या न करण्याची आर्त साद घातली. शेतकऱ्यांच्या कष्टाची कैफियत शब्दबद्ध केली. त्याचे दुर्दैवं असे त्याने कविता ज्या दिवशी सादर केली, त्याच रात्री त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.

        ही बातमी वाऱ्यासारखी समाजात पसरली. वर्तमानपत्रात टिव्ही चैनल वर बातम्या आल्या. समाजातील अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली. काहींनी मदतीचा हात पुढे केला, तर काहींनी फक्त पोकळ आश्वासने दिली.

        या सर्वांमध्ये एक फोन येऊन गेला. अनोळखी माणूस तिकडून बोलत होता व मला आधार संस्थेची माहिती सांगत होता. सर आम्ही समाजातील अनाथ, वंचित पिडीत, शोषित मुलांना दत्तक घेतो. त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारतो. जोपर्यंत ही मुलं शिकतात तोपर्यंत आधार ही संस्था त्यांना आधार देण्याचे काम करते.

        खरंचच विचार केला तर आधार म्हणजे काय हो? वंचित, शोषित, पीडितांना जगण्याची उमेद देणे म्हणजे आधार. त्यांना जीवनमार्ग दाखवणे म्हणजे आधार. त्यांच्या मनगटामध्ये कष्टाचे आणि मेंदूमध्ये सद्विचारांचे बळ भरणे म्हणजे आधार. ही सर्व कामे आधार ही संस्था अगदी निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे पार पाडत आहे. गेल्या वर्षी आधार संस्थेने स्व.मल्हारी बटुळे यांच्या लेकरांना दिवाळी भेट व शैक्षणिक साहित्य पुरवले होते. या वर्षी दहा दिवसांपूर्वी रोख सात हजार रुपये आधार संस्थेने पाठवले. या पैशांमधून प्रिती, प्रमोद आणि प्रशांत यांना शैक्षणिक साहित्य, कपडे, शूज, अवांतर वाचनाची पुस्तके, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके देण्यात आली. या होतकरू लेकरांना आधारने दत्तक घेतले आहे.

        समाजातील वंचितांचा, पिडीतांचा आपण आधार बणूया. हा उदात्त, निर्मळ आणि प्रामाणिक विचार घेऊन आधार संस्थेमधील सर्व सदस्य निरपेक्षपणे काम करताहेत. त्यांना ना प्रसिद्धीची हाव आहे, ना मानसन्मानाची. त्यांचे स्थान गरजू विद्यार्थ्यांच्या काळजामध्ये कोरले आहे. जिथे गरज आहे तिथपर्यंत आधार पोहोचत आहे. प्रति महिना फक्त १०/- रुपये याप्रमाणे १२०/- रुपयांत एक वर्षाची मेंबरशिप आपल्यालाही घेता येते व ती आपण घ्यावी ही नम्र विनंती. या मदतीतूनच गरजू लेकरांना आधार देण्याचं काम आधार ही संस्था करत आहे या संस्थेच्या मदतीतूनच अनेक विद्यार्थी घडले आहेत, घडत आहेत व भविष्यातही घडतील.

      आधार संस्थेला  द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. बटुळे कुटुंबातील लेकरांच्या आयुष्यात आपण निर्माण केलेला प्रकाश एक दिवस नक्कीच चमकणार आहे. आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

        

भगवान विद्यालय खरवंडी ता-पाथर्डी, अहमदनगर या विद्यालयात

प्रशांत- पाचवी

प्रमोद- सातवी

प्रिती- नववी

या वर्गात शिक्षण घेत आहेत.

 

श्री.लहू बोराटे सर.

Read More

"चला समाजातील वंचितांचा, पीडितांचा आपण आधार बनुया"

No comments:

 












Read More

"मुलांना घडवायचे की बिघडावयाचे , पालकांनो वेळीच जागे व्हा"

2 comments:

 




Read More

"पुस्तक मैत्री दिन आधार फाउंडेशनतर्फे बालगृहात साजरा"

No comments:

 






Read More

"होतकरू श्रुतीचे आधारने स्वीकारले शैक्षणिक पालकत्व"

1 comment:

             नुकत्याच झालेल्या मीटिंग मध्ये डॉक्टर साहेबांनी श्रुती राहुल राजगुरू या मुलीची शिफारस केली होती. 

तिच्या वडिलांचे २० जानेवारी २०२१ ला अपघाती निधन झाले. तर तिची आई हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करते.

 त्या राहणे मळा या ठिकाणी भाडेतत्त्वावर असलेल्या खोलीत राहतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालवत आहे. 

श्रुती इयत्ता पहिलीत शिक्षण घेत असून तिचा भाऊ छोटा आहे.आज केलेली मदत खूपच समर्पक आहे. त्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद तिच्या शाळेविषयीची आवड सांगत होते.

आधार फाऊंडेशन संगमनेर यांनी तिच्या पूर्ण शैक्षणिक खर्च घेण्याचे ठरविले आहे. यातूनच पुढे ही मुलगी स्वतः च्या पायावर उभी राहील.

आधार फाउंडेशन नक्कीच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहे आणि हुशार व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

आधार फाउंडेशन संगमनेर .



Read More

Tuesday, January 4, 2022

No comments:

 

Sukhadev Ilhe <ilhesukhadev@gmail.com>

2:02 PM (0 minutes ago)

Description: https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

Description: https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

to me

Description: https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

Marathi

English

   

Translate message

Turn off for: Marathi

*Description: ❇️संगमनेरचे वैभव : वंचितांचे आधार फौंडेशन’*

 

_Description: 🖊️- सुखदेव इल्हे सर_

Description: ➖Description: ➖Description: ➖Description: ➖Description: ➖Description: ➖Description: ➖Description: ➖Description: ➖

*Description: 🗞️दैनिक युवावार्ता*

 https://yuvavarta.in/glory-of-sangamner-aadhar-foundation-for-the-deprived/

Read More

Friday, December 3, 2021

आदर्श शिक्षक..उत्तम लेखक,समाज प्रबोधनकार, चांगले कलाकार, कवी.. समाजभान असलेला चांगला माणूस....

No comments:

 मा.लतिफ पटेल सर..

नुकतेच घर बांधले, अन्नदान गरजूला करावं म्हणून आधार दिवाळी आठवली..

सत्पात्री दान जाईल याची खात्री वाटली...

शिवाय आज लतिफ गुरूजींचा वाढदिवस आहे..हा संगम साधत..

आधार दिवाळीसाठी.. ₹ 5000 -पाच हजार मात्र.अनमोल देणगी आनलाईन दिली.

वास्तुशांतीचा खर्च वाचवून जात..धर्म न मानता... मानवतावादी सन्मा. लतिफ महंमद पटेल गुरूजींना ...

*आधार परिवाराच्या लाख लाख शुक्रिया*..


हिंद देश के निवासी..

सभी जन एक है।

रंग रुप वेश भाषा...

चाहें अनेक हैं।

लतिफ सर आपण चांगला संदेश भारत वासियांना..दिलात... धन्यवाद...



 


Read More

"शुभम संजय वाघ आधारच्या मदतीने आय टी आयला दाखल..."

No comments:


वडील लहानपणी वारलेले.आई मजुरी करुन कशीबशी कुटुंब चालवायची. मोठा मुलगा कॉलेजला जाऊ लागला. आता मुलांचा आधार मिळेल.आईला खूप बरं वाटायचं. पण अचानक मोठ्या मुलाचा मित्रांकडून घात झाला. आभाळच कोसळलं... नव-याच्या धक्यातून बाहेर यायच्या आतच मुलाचा दुसरा धक्का बसला, अन् आईवर मानसिक परिणाम झाला.  

आई संगिता हीस श्रीरामपूर येथील डॉ. उंडे यांचा उपचार चालू असून दर महिन्याला दोन ते अडीच हजार रूपये खर्च येतो. शुभम सुट्टीत शेतात मिळेत ते काम करून थोडेफार येणाऱ्या पैशात कुटुंब चालवून शिक्षणही घेत आहे. आईच्या मानसिक असंतुलनामुळे घरी आल्यावर स्वयंपाक करण्यासाठी त्याला वयोवृद्ध लिलावती आजीला मदत करावी लागते.

     परवा मदत घेण्यासाठी आजीही शुभम सोबत आली होती. "सर, शुभमला स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे.. असं काही पुण्याचं काम करा.. लई उपकार होतील." हे सांगताना तिची मान डुगडुग करत होती." बोलताना तिचा आवाज कापत होता, डोळ्यात अश्रू होते. मी आजीला व शुभमला धीर दिला.

अमृतवाहिनी आयटीआयचे प्राचार्य एस टी देशमुख  यांनी शुभमची परिस्थिती समजून घेतली. त्याला फिटर ट्रेडसाठी प्रवेश दिला.ते शुभमला "अर्न अँड लर्न" योजनेत सहभाग देणार आहेत. उरलेल्या फी बाबत शिष्यवृत्ती मिळवून देणार आहेत.

 इतर सहकार्य करणार असल्याची माहिती प्राध्यापक बाळासाहेब आहेर यांनी दिली.शुभम अत्यंत संघर्षात १२ वी झाला असून शेतात मिळेल ते काम करुन कुटुंब चालवत आहे.

आधारने नुकतेच शुभमला दत्तक घेतले असून अमृतवाहिनी आय टीआय कॉलेजला प्रवेश दिला आहे.

शुभमच्या प्रवेशासाठी आधार फाऊंडेशन संस्थेने नुकताच *दहा हजार रुपयांचा चेक* दिला. वह्या,सॅक,आदी साहित्य दिले.

शुभमला तिगाव ते अमृतवाहिनी  कारखाना, अमृतनगर हे २५ किलोमिटर अंतर ये-जा करायचे आहे. एसटीचा संप असल्याने दररोज त्याचा ९० रु खर्च कसा करावा हाही प्रश्न आहे. 

पण शुभम अत्यंत समजदार आहे.संघर्ष करायची त्याची तयारी आहे. जिद्द अन् प्रयत्नांची पराकाष्ठा करत आधारच्या साथीनं त्याला आपण बळ देऊया.. माणूसपण जपत त्याच्या पंखात बळ देऊया.


Read More

ऊसतोड कामगारांची दिवाळी "आधार"कडून गोड.

No comments:

 






Read More

Friday, October 22, 2021

"आधार दत्तक योजनेतील विद्यार्थ्यास नवीन सायकल भेट दिली"

1 comment:

 आज आधार शैक्षणिक दत्तक पालक योजने अंतर्गत  श्रमिक ज्युनियर कॉलेज,संगमनेर येथे 12वी वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या

 हुजैफ असिफ  शेख या विद्यार्थ्याला गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा,आदर्श शिक्षिका सौ.वृषाली कडलग मॅडम यांनी नवीन सायकल भेट दिली. 

याप्रसंगी आधार फाउंडेशन चे समन्वयक डॉक्टर महादेव अरगडे, पी. डी. सोनवणे सुखदेव इल्हे आदि उपस्थित होते.

 धन्यवाद मॅडम



Read More

"कोविडग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्याला आधारने घेतले दत्तक"

No comments:

 संगमनेर :-(प्रतिनिधी)

सुदर्शन संजय बिडवे. मु. पो- हिवरगाव आंबरे, ता- संगमनेर 

 इयत्ता 12 वी सायन्स


वडीलांचे ०१/०९/२०२१ रोजी कोविड 19 ने वारले.घरावर संकट कोसळले.

सलून काम बंद झाले. आई घरकाम करते. सुदर्शनच्या 12वी प्रवेशासाठी आधारने  मदने सरांच्या माध्यमातून सह्याद्री कॉलेजमध्ये फोन करून फी कमी केली.

उरलेले 2000 ₹ आधारने नुकताच चेक दिला.

सुदर्शनचे शिक्षण पुर्ववत सुरु झाले. आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेत त्याला वह्या, पुस्तके, शूज सॅक आदी साहित्य दिले.





Read More

"बाल मूर्तिकार रेवणनाथ नवलेला आधारने घेतले दत्तक"

No comments:

   तालुक्यातील मालदाड येथील बाल मूर्तिकार रेवणनाथ नवले या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर नुकताच प्रसारित झाला.

 त्यामध्ये हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक अध्ययनापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले. 

कारण कोविड-१९ या आजाराच्या  प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण चालू आहे.

 भूमीहीन असणारे,अपघाताने दिव्यांग झालेली वडील सध्या काम नसल्याने घरीच आहेत. आई मोलमजुरी करते, अशात अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी पैसे कुठून आणणार? 

घरात खाणारी तोंड पाच अशाही परिस्थितीत उपजतच शिल्पकलेचे ज्ञान अवगत असलेला रेवणनाथ हा त्यांचा मोठा मुलगा इयत्ता सहावीत शिकतोय वयाने लहान असला तरी फोटो पाहून हुबेहूब मूर्ती बनविण्याचे कसब त्याच्या अंगी आहे 

जणू काही एखादा निष्णात कलाकारच मूर्तिकार असावा, अशा मूर्ती स्वतःच्या हाताने कोणतेही यांत्रिक साहित्य न वापरता तो तयार करतोय, रंगवतोय.

याची चाहूल त्याच्या मुख्याध्यापकांना गृह भेटीदरम्यान लागली. त्यांनी मूर्ती बनवत असतानाचा एक व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर अपलोड केला.

 त्यानंतर हा व्हिडिओ आधारचे शिलेदार बाळासाहेब गडाख व आधारचे समन्वयक अनिल कडलग यांच्या पाहण्यात आला. 

त्यांनी आधार समन्वयकांशी चर्चा करून सुरुवातीला त्याच्या शैक्षणिक  गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे सुचवले. 

सर्व परिस्थिती समजावून घेत आधार समन्वयकांनी या विद्यार्थ्यांची आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेसाठी निवड केली.

 त्यानंतर कॉर्नर मोबाईल शॉपीचे संचालक संजय अभंग यांच्या सहकाऱ्याने आधार फाउंडेशनने रेवननाथला  ऑनलाईन शिक्षणासाठी एक अँड्रॉइड मोबाईल घेतला. 

तसेच शालेय उपयोगी साहित्य, स्कूल बॅग, गणवेश, शूज  आदि साहित्यासह आधार समन्वयकांनी रेवणनाथचे घर गाठले.  

सोबतच शिल्पकार सुनील मादास हे ही होते.  त्यांनी या बाल मूर्तिकारांची शिल्पकला पाहून त्याला त्याच्या आयुष्यात शिल्पकार बनण्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींसाठी मदत करण्याचं जाहीर केलं. 

आधारची ही भेट पाहून रेवणनाथसह त्याचे कुटुंबीय भारावून गेले. आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेअंतर्गत रेवणनाथच्या पुढील शिक्षणाची सर्व जबाबदारी आधार फाउंडेशनने उचलली आहे.

यासाठी आधारचे मार्गदर्शक साहेबराव नवले यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.आणखी काही सामाजिक संस्थानी मदत केल्यास गरजू व होतकरू कुटुंबाच्या प्रगतीसाठी रेवणनाथ भविष्यात नक्कीच उंची गाठू शकेल.

   याप्रसंगी आधारचे समन्वयक सोमनाथ मदने, अनिल कडलग, बाळासाहेब गडाख, सुनिल मादास,सुखदेव गाडेकर,सरपंच गोरक्ष नवले,

श्रमशक्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास डोंगरे, गोपीनाथ नवले, निलेश नवले, सचिन नवले, जालिंदर नवले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.




Read More

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.